Tuesday, 26 May 2020

कविता


सांगा ना गुरुजी कधी भरेल शाळा ?


दिवसा मागून दिवस चालले
काही काहीच होत नाही
कोरोनाची भीती अजून
थोडीशीही जात नाही
दोन महिन्यांपासून आम्ही
पाहिला नाही फळा,
  सांगा ना गुरुजी
कधी भरेल शाळा  ?       || १||

मोबाईल ,टीव्ही आणि
घर आता नको झाले
 शाळेच्या घंटेसाठी
कान माझे आसुसलेले
मैदानात मित्र सारे
होतील कधी गोळा ?
  सांगा ना गुरुजी
कधी भरेल शाळा ?  ||  २ ||

बागेतली रोपे आपली
होती छान  फुलली
दोन महिने आम्ही
तीही नाही पहिली
फुलवू द्याना आम्हा
चिमुकला मळा
  सांगा ना गुरुजी
कधी भरेल शाळा ?   || ३ ||

कवितेच्या ओळी
कानी माझ्या येतात
इंग्रजीच्या स्टोरी
ओठांवरती येतात
असेच होते होणार
तर लावला का लळा ?
  सांगा ना गुरुजी
कधी भरेल शाळा ?  || ४ ||

   सुधाकर रामदास पाटील
 शाळा - शेलवली बांगर केंद्र-अल्याणी
 ता.शहापूर जि. ठाणे मो. 7798963063

No comments: