|| गुरुवंदना ||
गुरु कल्पवृक्ष माझा
गुरु ज्ञानाचा सागर
गुरु पूर्णब्रम्ह रुप
गुरु शांतीचे आगर.
गुरु सागर अथांग
गुरु फेसाळतं पाणी
गुरु भुक्या देई घास
गुरु मुक्या देई वाणी.
गुरु गाय मी वासरु
गुरु मायेचाच पान्हा
गुरु आईचेच रुप
गुरु यशोदा मी कान्हा.
गुरु पूर्ण मी अपूर्ण
गुरु जीविचाच जीव
गुरु साधा भोळा माझा
गुरु पार्वतीचा शीव
गुरु जीवनाचे गाणे
गुरु पाखरांचा गळा
गुरु हिरवे शिवार
गुरु पिकलेला मळा.
गुरु सुखाचा सोहळा
गुरु आंधळ्यास डोळे
गुरु पांगळ्याची काठी
गुरु मधाचेच पोळे.
गुरु तुक्याचा अभंग
गुरु अभंगांची गाथा
गुरु भजनी मी दंग
गुरु चरणासी माथा.
कवी- श्री. केशव शेलवले सर - शहापूर
No comments:
Post a Comment