Sunday, 16 August 2020

Pre- Matric Scholarship

 Pre- Matric Scholarship 2020-21


              केंद्र शासनाने सन 2020-21 या वर्षासाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती ही योजना NSP पोर्टलवर 16/08/2020 पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

   सन 2020-21 साठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज १६/०८/२०२० पासून NSP पोर्टलवर ऑनलाइन भरू शकता. अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१/१०/२०२० आहे.

  सन २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन मध्ये प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, इतर शुल्क भरण्याचा पर्याय दिला जाणार नाही. त्याऐवजी शाळेच्या लॉगिन मध्ये वर्ग निहाय प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, इतर शुल्क भरू शकता व बदलू शकता. शाळेच्या लॉगिन मधून ज्यावेळी विद्यार्थ्यांचे अर्ज verify केले जातील त्यावेळी शाळेने वर्गनिहाय फी ची जी माहिती भरली असेल ती विद्यार्थाच्या फॉर्म मध्ये update होतील.

   ( कृपया यासाठी सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या कडून जे प्रत्यक्षात शुल्क आकरले जाते ते वर्ग निहाय माहिती भरण्याबाबतच्या सूचना देणेत याव्यात जेणेकरून विद्यार्थाना शिष्यवृत्तीची रक्कम मिळेल अन्यथा विद्यार्थास शिष्यवृत्ती मंजूर होऊनही रक्कम मिळणार नाही.)

     सन २०१९-२० मध्ये प्रत्येक शाळेच्या नोडल ऑफिसर यांचा kyc फॉर्म भरण्यास सांगितले होते अद्यापही काही शाळांनी त्यांच्या नोडल ऑफिसर यांचा kyc फॉर्म भरला नाही अशा सर्व शाळांना आपल्या स्तरावरून kyc फॉर्म भरण्याच्या सूचना देनेत याव्यात तसेच काही Duplicate अर्ज शाळा स्तरावरून verify केले गेले असे दिसून आले आहेत हे होऊ नये म्हणून आपल्या सर्व शाळांना नोडल ऑफिसर यांचा kyc फॉर्म भरून शाळेचा पासवर्ड बदलण्यास सांगा.(कृपया कोणीही default पासवर्ड ठेऊ नये)

(कृपया Nsp पोर्टल सुरू झालेनंतर सुरवातीस नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरा. सदर विद्यार्थ्यांच्या याद्या जिल्ह्याच्या लॉगिन मध्ये उपलब्द आहेत [ टीप विद्यार्थ्यांचे अर्ज भरत असताना सदर विदयार्थी अन्य कोणत्याही शिष्यवृत्ती चा लाभ घेत नसल्याची खात्री करा तसेच शिष्यवृत्ती चे सर्व नियम व अटी यांचे पालन करून सर्व अर्ज भरा ही विनंती]).

No comments: