Wednesday, 19 August 2020

मासिक वेतन दाखला


 Payment Slip On One Click 


                  सर्व सन्मा.केंद्रप्रमुख व शिक्षक बंधू -भगिनी यांना विविध कारणांसाठी आपल्या पगार दाखल्याची आवश्यकता असते


दरमहा वेतन झाल्यानंतर त्वरित आपल्या mobile मध्ये वेतन दाखला उपलब्ध व्हायला हवा अशी गरज ओळखून शहापूर तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू - भगिनींसाठी एका click वर दर महिन्याचा वेतन दाखला उपलब्ध करून देत आहोत. 

  • यासाठी आपणास आपल्या वैयक्तिक Password ची गरज असणार आहे. 
  • आपला वैयक्तीक पासवर्ड मिळवण्यासाठी कृपया आपल्या केंद्राच्या ग्रुप वर प्राप्त झालेला Google Form भरावा.

🔯 संकल्पना

▶️ श्री उमेश बेंडाळे सर


🔯 सहकार्य 

▶️ सर्व शालार्थ मास्टर ट्रेनर शहापूर

▶️ STEP Team शहापूर


✅ सदर उपक्रम प्रथमच सुरू करण्यात येत असल्याने काही तांत्रिक अडचणी येऊ शकतील या अडचणींच्या सोडवणुकी करिता आपण मला व  STEP TEAM शी संपर्क करू शकता.🙏

🔯 STEP TEAM

श्री.महेंद्र धिमते सर

श्री. सुशांत ठाकरे सर

श्री. निरंजन पटवर्धन सर




▶️ सदर उपक्रमाचा प्रारंभ दिनांक 5 सप्टेंबर 2020 रोजी करावयाचा असल्याने ज्या शिक्षकांना दरमहाचा वेतन दाखला हवा आहे त्यांनी दिनांक 20/08/2020 पर्यंत Google Form मधील माहिती भरून submit करावी


                                                                                                                 ✒️   आपला

                                                                                                          श्री. उमेश  बेंडाळे सर

                                                                                                                  9823997547



Sunday, 16 August 2020

Pre- Matric Scholarship

 Pre- Matric Scholarship 2020-21


              केंद्र शासनाने सन 2020-21 या वर्षासाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती ही योजना NSP पोर्टलवर 16/08/2020 पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

   सन 2020-21 साठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज १६/०८/२०२० पासून NSP पोर्टलवर ऑनलाइन भरू शकता. अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१/१०/२०२० आहे.

  सन २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन मध्ये प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, इतर शुल्क भरण्याचा पर्याय दिला जाणार नाही. त्याऐवजी शाळेच्या लॉगिन मध्ये वर्ग निहाय प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, इतर शुल्क भरू शकता व बदलू शकता. शाळेच्या लॉगिन मधून ज्यावेळी विद्यार्थ्यांचे अर्ज verify केले जातील त्यावेळी शाळेने वर्गनिहाय फी ची जी माहिती भरली असेल ती विद्यार्थाच्या फॉर्म मध्ये update होतील.

   ( कृपया यासाठी सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या कडून जे प्रत्यक्षात शुल्क आकरले जाते ते वर्ग निहाय माहिती भरण्याबाबतच्या सूचना देणेत याव्यात जेणेकरून विद्यार्थाना शिष्यवृत्तीची रक्कम मिळेल अन्यथा विद्यार्थास शिष्यवृत्ती मंजूर होऊनही रक्कम मिळणार नाही.)

     सन २०१९-२० मध्ये प्रत्येक शाळेच्या नोडल ऑफिसर यांचा kyc फॉर्म भरण्यास सांगितले होते अद्यापही काही शाळांनी त्यांच्या नोडल ऑफिसर यांचा kyc फॉर्म भरला नाही अशा सर्व शाळांना आपल्या स्तरावरून kyc फॉर्म भरण्याच्या सूचना देनेत याव्यात तसेच काही Duplicate अर्ज शाळा स्तरावरून verify केले गेले असे दिसून आले आहेत हे होऊ नये म्हणून आपल्या सर्व शाळांना नोडल ऑफिसर यांचा kyc फॉर्म भरून शाळेचा पासवर्ड बदलण्यास सांगा.(कृपया कोणीही default पासवर्ड ठेऊ नये)

(कृपया Nsp पोर्टल सुरू झालेनंतर सुरवातीस नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरा. सदर विद्यार्थ्यांच्या याद्या जिल्ह्याच्या लॉगिन मध्ये उपलब्द आहेत [ टीप विद्यार्थ्यांचे अर्ज भरत असताना सदर विदयार्थी अन्य कोणत्याही शिष्यवृत्ती चा लाभ घेत नसल्याची खात्री करा तसेच शिष्यवृत्ती चे सर्व नियम व अटी यांचे पालन करून सर्व अर्ज भरा ही विनंती]).

अभंग


   श्रावण महिमा


श्रावणाच्या सरी |उन्हात नाहती |

सुगंधे वाहती| रान फुले ||


नदीलाही झाली |श्रावणाची बाधा|

कृष्णा संगे राधा| नादावली ||


श्रावणाचा मास| इंद्रधनु दावी |

आभाळाच्या लावी|गाली तीट||


धरणीस मिळे| नभाचे हे दान |

तरारले रान|श्रावणात ||


घेऊनिया येई|सण खांद्यावरी |

जणू वारकरी | विठ्ठलाचा ||


खेडोपाडी चाले|ग्रंथांचे पुजन|

अध्यात्म सृजन|पारायणे ||


माहेर वाशिणी|माहेराला येती |

उजळती वाती |दुर्मुखल्या||


म्हणे हा केशव|सर्वा मिळो सुख|

आनंदावे मुख|प्राणिमात्रा ||



कवी श्री. केशव शेलवले सर

शहापूर