जय हरी विठ्ठल
कोरोनाची यंदा
आली महामारी
चुकली ही वारी
पंढरीची ॥१॥
सारे भक्तजन
घरात बसून
घेऊया दर्शन
विठोबाचे ॥२॥
निस्सीम श्रद्धेने
पुजुया मनात
येईल घरात
विठुराया ॥३॥
विनवु विठ्ठला
जोडोनिया कर
कृपाछत्र धर
सर्वांवर ॥४॥
सकलांना आहे
तुझीच रे आशा
संपव ही दशा
जनतेची ॥५॥
पांडुरंगा आता
थांबव हा खेळ
टळू दे ही वेळ
संकटाची ॥६॥
कवी - श्री विजय धानके सर
नांदगाव,किन्हवली७६६६३०१९०८
No comments:
Post a Comment