नमस्कार मित्रानो,
मी श्री. नितीन मधुकर डोळसे (पदवीधर प्राथमिक शिक्षक), शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा सावरोली, तालुका - शहापूर, जिल्हा - ठाणे माझ्या सर्व शिक्षक मित्रांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली एक नवीन उपक्रम सुरू करत आहे. काही दिवस झाले एक कल्पना मनात घोळत होती ती प्रत्यक्षात साकार होत आहे. मी रोज एक संग्रहित गोष्ट ऑडिओ स्वरूपात आपण सर्वाना what's app ग्रुप वर पाठवत आहे. तरी आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाक्य, कथा कानावर पडण्यासाठी मी पाठवलेल्या ऑडिओ फाइल स्वरूपातील small stories छोट्या छोट्या गोष्टी आपल्या वर्गाच्या what's app ग्रुप वर शेअर करून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक इंग्रजी श्रवणाचे व्यासपीठ उपलब्ध करून द्याल अशी अपेक्षा करतो.
धन्यवाद.
श्री. नितीन मधुकर डोळसे
(पदवीधर प्राथमिक शिक्षक),
शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा सावरोली
No comments:
Post a Comment